रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:29 PM2020-02-24T23:29:00+5:302020-02-25T00:23:25+5:30
निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.
निफाड : तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.
या भागातील रस्त्यांसह रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या विविध सूचना फलकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. जेथे वळण रस्ता आहे, त्या रस्त्याची माहिती देणाºया दिशादर्शक फलकानेसुद्धा रस्त्याप्रमाणे वळण घेतलेले आहे. ‘पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा’ अशाप्रकारे वाहनचालकांला पुढील अपघाती वळणाची माहिती देणारे फलक पूर्णत: वाकून गेल्याने दिसून येत नाहीत. फलकाकडे बघून असे वाटते की हा फलक आपल्याला सुचवित आहे की पुढे येणाºया रस्त्याची अवस्था ही माझ्यासारखीच वळणाकृती झालेली असून वाहने सावकाश चालवा. तसेच ‘डू नॉट ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’ अशी माहिती देणारे फलक तर उलटेच झालेले आहेत, जणूकाही बोर्ड दारू पिऊन उलटा झालेला आहे. नाशिक-औरंगाबाद हायवेच्या बाजूला लावण्यात आलेल्या फलकांची अवस्था अशीच आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गा वरील नैताळे येथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलक तेथील बांबू व्यावसायिकांनी फलकाच्या बाजूला बांबूंची थप्पी लावून पूर्णता झाकवलेला आहे. फलकाच्या बाजूने लावलेल्या बांबूच्या थप्पीमुळे तेथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलकाचा फक्त १० टक्के भाग उघडा आहे. बºयाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि रस्ता दुभाजक यांवरील सूचना फलकच गायब झालेले असून, फक्त फलकांसाठी लावण्यात आलेले खांब उभे आहेत. अपघाताची माहिती देणारे बोर्ड काढून नेले आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आणि गावाचे नाव, गावाचे अंतर दर्शविणाºया फलकांवर सध्या जाहिरातींनी अतिक्रमण केले आहे. परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि फलकांची मरणासन्न अवस्था याबाबत सा.बां. विभागास कळवूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
- विजय गिते, मा. उपसरपंच, खेडलेझुंगे
रस्त्याच्या कडेला शेतमाल आणि फळफळावळ विक्र ी करणाºया शेतकरी, व्यापारी वर्गाला रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे अडचण निर्माण होते. सुरक्षित जागा मिळण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.
- सदाभाऊ कोटकर, सामाजिक कार्यकर्ता, नैताळे