नगरसेवकपदावर गंडांतर; हेमंत शेट्टींची धावपळ मनपा : उद्याच्या महासभेत हजेरी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:57 AM2017-11-19T00:57:23+5:302017-11-19T01:02:02+5:30
नाशिक : गुन्हेगाराच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून मध्यवर्ती कारागृहात असलेले पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी हे गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेच्या महासभांना गैरहजर असून, येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे पद धोक्यात येणार आहे. दरम्यान, शेट्टी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे सांगितले जात असून, न्यायालयाचा आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने शेट्टी यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

दि. २६ मे २०१७ रोजी पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह सहा संशयितांना अटक केली होती. तत्पूर्वी, दि. १८ मे २०१७ रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेला हेमंत शेट्टी यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, हेमंत शेट्टी यांची रवानगी नंतर नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झाली. तेव्हापासून शेट्टी कारागृहातच आहेत. महाराष्टÑ प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार, सलग तीन महिन्यांच्या सभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवकपद रद्दबातल ठरविले जाते. त्यामुळे, शेट्टी यांनी पहिले दोन महिने रजेचा अर्ज दिल्याने सदस्यपदाला धोका राहिला नव्हता. परंतु, शेट्टींचा कारागृहातील मुक्काम वाढत गेला. अधिनियमानुसार, लागोपाठ सहा महिन्यांच्या सभांना गैरहजर राहिल्यास महापालिकेने मान्य केलेले असो वा नसो, नगरसेवकपद आपोआप रद्द होण्याची तरतूद आहे. हेमंत शेट्टी हे आतापर्यंत जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांत झालेल्या महासभांना गैरहजर राहिलेले आहेत आणि येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला गैरहजर राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते. दरम्यान, शेट्टी यांना जामीन झाला असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला नसल्याचीही चर्चा आहे. तरीही सोमवारी महासभेला हजर राहण्यासाठी कारागृहातून परवानगी मिळविण्याचे प्रयत्न शेट्टींकडून सुरू असल्याचे समजते. महासभेत चार प्रस्तावयेत्या सोमवारी होणाºया महासभेत हेमंत शेट्टी यांनी चार प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे दि. २४ आॅक्टोबर रोजी सादर केलेले आहेत. शेट्टी यांनी सदर प्रस्ताव नगरसचिव विभागाला दिल्याचे पत्र महापालिकेकडून पंचवटीतीलच भाजपाच्या एका नगरसेवकाने घेऊन ते कारागृहाच्या अधीक्षकांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचे काम केल्याचे समजते. त्यामुळे सोमवारी शेट्टी हजर होण्याची शक्यता आहे.