कोथिंबिरीचे बियाणे सदोष
By admin | Published: May 29, 2017 12:10 AM2017-05-29T00:10:49+5:302017-05-29T00:11:01+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कोथिंबिरीचे बियाणे हे सदोष निघाले असून, शेतकऱ्यांचे यात नुकसान झालेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कोथिंबिरीचे बियाणे हे सदोष निघाले असून, शेतकऱ्यांचे यात नुकसान झालेले आहे. कोथिंबीर ही तीस दिवसांची झाल्यावर तिला मोठ्या प्रमाणात तुरे (डोंगळे, फुले) आल्याने व्यापारी ही कोथिंबीर घेत नसून, भांडवल उभे करून घेतलेले पीक मातीमोल भावाने विकावे लागणार असल्याने अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी कळवणहून बियाणे खरेदी केले होते. या बियाण्यांपासून पिकविलेल्या कोथिंबिरीला तुरे (डोंगळे, फुले) आल्याने व्यापारी घेत नसल्याने या बियाण्यात फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे मत असून, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री झाल्याबाबत कळवण कृषी विभागाकडे संबंधित कंपनीविरोधात शेतकरी बांधवांनी तक्रार केली आहे. जुनी बेज येथील शेतकरी विनोद खैरनार, मुरलीधर बागुल, भरत बच्छाव, जगदीश बच्छाव, रमेश बच्छाव, नरेंद्र बच्छाव, दीपक बच्छाव, प्रशांत बच्छाव या आठ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपनी व कळवण येथील बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर कारवाई व्हावी, असे कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.