भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:40 AM2019-09-30T00:40:21+5:302019-09-30T00:40:42+5:30

सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.

Corruption, discrimination and domesticism do not have a place | भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

Next

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.
स्थळ : सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ
सातपूर : सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. घराणेशाहीला थारा देऊ नये. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी स्वत:चे वेतन एका झटक्यात वाढवून घेतात आणि ज्येष्ठ पेन्शनर्स लोकांना पेन्शन वाढावी, वर्षानुवर्षे सरकारकडे पाठपुरावा करावा लागत आहे. याची लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे. अशी संतप्त भावना सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने चौकाचौकांत, कट्ट्यांवर राजकारणाच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या आहेत. सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात चाललेल्या गप्पांचा घेतलेला वेध घेतला, त्यावेळी ज्येष्ठ नागरिक पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यात जमीन आसमानचा फरक आहे. त्याकाळी उमेदवाराच्या मागे सच्चे कार्यकर्ते असत. सध्या पैशांच्या जोरावर मते मिळविली जात आहेत. जमविलेली संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. अशा लोकांना उमेदवारी देऊ नये, दिलीच तर मतदान करू नये. पूर्वीच्या काळी निवडणुकीत मतदारांविषयी आदर होता. आता त्यात व्यावसायिकता आली आहे. अशा भावना सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत.
(या चर्चेत किसनराव खताळे, शांताराम पाटील, पांडुरंग गोटीवाले, बाबाजी सोनवणे, हिंमतराव जगताप, सखाराम शिरसाठ, बाबूलाल तिवारी, सुरेश पवार, आर. एल. एखंडे, विश्वनाथ भंदुरे, बी. ई. बागुल, सोमनाथ ठाकरे, नरेंद्र पुणतांबेकर यांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.)
आपण निवडून दिलेल्या आमदार-खासदारांनी नागरिकांची कामे केली पाहिजेत. मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झाले पाहिजे. आम्ही आयुष्यभर नोकरी करतो तेव्हा आम्हाला पेन्शन मिळते. आमदार-खासदार कोणती नोकरी करतात? ते नोकरदार नाहीत तर लोकसेवक आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन का दिली जाते? आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका.

Web Title: Corruption, discrimination and domesticism do not have a place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.