कोथिंबीर भडकली 61 रूपये जुडी

By admin | Published: April 12, 2017 04:11 PM2017-04-12T16:11:50+5:302017-04-12T16:11:50+5:30

उन्हाळा सुरू झाल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा परिणाम शेतमालावर होऊ लागला आहे.

Cosimar bhadkali 61 rupees doubles | कोथिंबीर भडकली 61 रूपये जुडी

कोथिंबीर भडकली 61 रूपये जुडी

Next


पंचवटी : उन्हाळा सुरू झाल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा परिणाम शेतमालावर होऊ लागला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर मालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर 61 रूपये प्रति जुडी दराने विक्री झाली.
आडत बंद झाल्यानंतर कोथिंबीरला हा चालू वर्षातील बाजारभावाचा उच्चांक मिळाल्याचे बाजारसमिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. पंधरवाडयापासून बाजारसमितीत कोथिंबीर आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजित येत आहे. काही दिवसांपुर्वी कोथिंबीरला 57 रूपये प्रति जुडी बाजारभाव मिळाला होता.
मंगळवारी शिवांजलू व्हेजीटेबल कंपनीत विलास ढुमसे या शेतकऱ्याने आणलेल्या कोथिंबीर मालाला शेकडा 6100 रूपये (61) रूपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याचे बाळासाहेब कर्डक यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Cosimar bhadkali 61 rupees doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.