कोथिंबीर १३०, तर मेथी ५१ रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:01 AM2017-09-18T00:01:25+5:302017-09-18T00:04:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारभाव वाढले आहे. रविवारी कोथिंबीर तेरा हजार रुपये शेकडा दराने विक्र ी झाली.
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत
विक्रीसाठी येणाºया कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारभाव वाढले आहे. रविवारी कोथिंबीर तेरा हजार रुपये शेकडा दराने विक्र ी झाली.
गुरुवार (दि.१४) कोथिंबीरची आवक कमी प्रमाणात आल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत येऊन कोथिंबीर ८० रुपये प्रती जुडी दराने विक्र ी झाली होती, तर पंधरवड्यापूर्वी अवघ्या एक रुपया प्रती जुडी अशा मातीमोल बाजारभावाने विक्री झालेल्या कोथिंबीर जुडीला रविवारी (दि. १७) सायंकाळी झालेल्या लिलावात १३० रुपये प्रती जुडी असा बाजारभाव मिळाला आहे. परतीच्या पावसाने सलग तीन चार दिवस हजेरी लावल्याने शेतातील उभ्या कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजारभाव पुन्हा तेजीत आलेले आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरला तेरा रुपये शेकडा बाजारभाव मिळाल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे.
सध्या पितृपक्ष सुरू असल्याने आणि त्यातच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागांत दमदारपणे हजेरी लावल्याने कोथिंबीर माल भिजला गेला आहे. त्यातच आवक कमी असली तरी कोथिंबीर मालाला उठाव जास्त असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. रविवारी लिलावात १३० रुपये प्रती जुडी बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.