कोथिंबीर जुडी अवघी दोन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:50 AM2018-01-09T00:50:09+5:302018-01-09T00:52:17+5:30

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला. नाशिक पाठोपाठ पुणे, खेड, मंचर या भागांतील स्थानिक कोथिंबीर माल बाजार समितीत दाखल होत असल्याने तसेच कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली आहे. आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. कोथिंबीरचे बाजारभाव घसरल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Cottibir jodi only two rupees | कोथिंबीर जुडी अवघी दोन रुपये

कोथिंबीर जुडी अवघी दोन रुपये

Next
ठळक मुद्देबाजारभाव घसरले : आवक वाढली पुणे, खेड, मंचर या भागांतील स्थानिक कोथिंबीर माल बाजार समितीत दाखल

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला. नाशिक पाठोपाठ पुणे, खेड, मंचर या भागांतील स्थानिक कोथिंबीर माल बाजार समितीत दाखल होत असल्याने तसेच कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली आहे. आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. कोथिंबीरचे बाजारभाव घसरल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव घसरल्याने शेतकºयांना आपला माल परत न्यावा लागला. गेल्या डिसेंबरमध्ये कोथिंबीरच्या भावाने शेतकºयांना चांगलाच दिलासा दिला होता. कोथिंबीरची आवक मर्यादित राहिल्यामुळे शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळाला होता. जानेवारीतही चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना पहिल्याच आठवड्यात शेतकºयांना अपेक्षित भाव मिळू शकला नाही.

Web Title: Cottibir jodi only two rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.