कोथिंबीर मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:08 AM2018-06-28T01:08:40+5:302018-06-28T01:13:22+5:30

पंचवटी : गेल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या बळीराजाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने बुधवारी (दि. २७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर मालाची आवक झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. काही कोथिंबीर जुड्यांचा लिलाव न झाल्याने नाराज शेतकºयांना जनावरांसाठी कोथिंबीर माल सोडून द्यावा लागल्याचे चित्र बाजार समितीत दिसून आले.

 Cottimburi Matimol | कोथिंबीर मातीमोल

कोथिंबीर मातीमोल

Next
ठळक मुद्देमेथी ३५, शेपू २०, कांदापात ३० रुपये प्रति जुडीपावसाने उघडीप दिल्याने आवक वाढलीकोथिंबीरच्या चांगल्या मालाला ४००० रुपये शेकडा

पंचवटी : गेल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या बळीराजाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने बुधवारी (दि. २७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर मालाची आवक झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. काही कोथिंबीर जुड्यांचा लिलाव न झाल्याने नाराज शेतकºयांना जनावरांसाठी कोथिंबीर माल सोडून द्यावा लागल्याचे चित्र बाजार समितीत दिसून आले.
बुधवारी (दि. २७) बाजार समितीत यंदाच्या वर्षातील रेकॉर्डब्रेक कोथिंबीर मालाची आवक झाली. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी अशाप्रकारे कोथिंबीरची आवक झाली होती, असे व्यापाºयांनी सांगितले. कोथिंबीरला मातीमोल बाजारभाव मिळाला असला तरी मेथी, कांदापात, शेपू या भाजीपाला जुड्यांना चांगला बाजारभाव मिळाला.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर माल दाखल झाला. एरवी ओस पडलेला बाजार समिती आवार केवळ कोथिंबीरच्या ढिगाºयांनी भरगच्च झाल्याचे दिसून आले. तर ज्या चारचाकी वाहनांतून कोथिंबीर शेतमाल आणला जात होता अशा वाहनातील शेतमाल खाली करण्यासही जागा अपुरी पडत होती. कोथिंबीर मालाने बाजार समितीचे आवार भरगच्च झाले होते.
सायंकाळी सात वाजेनंतर तर बाजार समितीत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना वाहने घेऊन बाजार समिती बाहेर पडण्यासाठी कसरत करीतच वाहने न्यावी लागली.
बुधवारी सायंकाळी प्रचंड आवक आली होती. कोथिंबीरच्या काही मोठ्या जुड्या व चांगल्या मालाला ४००० रुपये शेकडा, (४० रुपये प्रति जुडी) तर हलक्या मालाला केवळ २०० रुपये शेकडा (२ रुपये प्रति जुडी) असा बाजारभाव मिळाला तर काही माल ओलसर असल्याने अशा मालाचा लिलाव झाला नाही. काही जुड्यांना मातीमोल बाजारभाव मिळाल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकºयांचा लागवड खर्च, दळणवळण खर्च न सुटल्याने त्यांनी जनावरांना शेतमाल सोडून काढता पाय घेतला तर काहींनी हातात पडेल ती रक्कम घेऊन समाधान मानले. कोथिंबीर वगळता मेथी ३५, शेपू २० तर कांदापात ३० रुपये प्रति जुडी दराने विक्र झाली.
खराब मालामुळे बाजार कोसळले
पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी सायंकाळी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची आवक झाली. आवक जास्त झाल्याने तसेच बराचसा कोथिंबीर माल खराब व ओला असल्याने काही मालाचा लिलाव झाला नाही तर मंगळवारी (दि. २६) कोथिंबीर ७० रुपये जुडी व बुधवारी ३ रुपये जुडी असा बाजारभाव मिळाल्याने काही शेतकºयांनी लिलाव रद्द करून शेतमाल बाजार समितीत जनावरांना सोडून दिला.
- चंद्रकांत निकम, संचालक बाजार समिती
आवक वाढल्याने बाजार कोसळले
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल दोन वर्षांपूर्वी असाच कोथिंबीर माल दाखल झाला होता. बुधवारी (दि. २७) सायंकाळी रेकॉर्डब्रेक कोथिंबीरची आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव २ रुपये जुडीवर आले तर काही कोथिंबीर मालाचे लिलाव झाले नाही.
- नितीन लासुरे, व्यापारी

कोथिंबीरच्या चांगल्या
मालाला ४००० रुपये शेकडा

पावसाने उघडीप
दिल्याने आवक वाढली

मेथी ३५, शेपू २०, कांदापात
३० रुपये प्रति जुडी

Web Title:  Cottimburi Matimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.