अभाविपतर्फे ‘परिषद की पाठशाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:02+5:302021-07-12T04:10:02+5:30
लाखलगांव, सिन्नरफाटा, गारुडवाडी, पांढुर्ली, पिंपळगाव (घाडगा), टाकेद आदी ठिकाणी पाठशाला सुरु आहेत. आणखी नवीन सुरु होणार आहेत. गेल्या दीड ...
लाखलगांव, सिन्नरफाटा, गारुडवाडी, पांढुर्ली, पिंपळगाव (घाडगा), टाकेद आदी ठिकाणी पाठशाला सुरु आहेत. आणखी नवीन सुरु होणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायापासून शैक्षणिक संस्थांपर्यंत सर्व काही बंद होते. पण शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून नातं दुरावत आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती आहे. गेल्या दीड वर्षापासून काही विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याने अभाविपने " परिषद की पाठशाला " उपक्रम राबविला. वस्ती, वाडी, गावात जाऊन त्याठिकाणी मंदिरात, सामाजिक सभागृहात, झाडाखाली मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे एकत्रित करुन पाठशालेत शिकवण्याचे काम
कार्यकर्त्यांनी केले. १० ठिकाणी सव्वादोनशे विद्यार्थ्यांना
पाठशालेत शिकवण्याचे काम सुरु आहे. या उपक्रमासाठी सागर जंजाळे, समृद्धी जोशी, श्रीकांत भोर, सानिका शेटे, ओंकार आव्हाड, श्रुती देशमुख, ऋषिकेश घाडगे, रोहन गाडगे, सुरज सकट, गणेश सकट,वैष्णवी जाधव व पूर्णवेळ कार्यकर्ते अरुण कराड यांनी परिश्रम घेतले.
110721\11nsk_5_11072021_13.jpg
अभाविपतर्फे ‘परिषदच की पाठशाला’