नगरसेवक पुत्राच्या नावाने खंडणी

By admin | Published: November 14, 2015 11:54 PM2015-11-14T23:54:19+5:302015-11-14T23:54:46+5:30

तिबेटीयन मार्केटमधील घटना : २० संशयितांवर गुन्हा दाखल

Councilor son ransom in the name of | नगरसेवक पुत्राच्या नावाने खंडणी

नगरसेवक पुत्राच्या नावाने खंडणी

Next

नाशिक : नगरसेवक पुत्राच्या नावाने २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती पूर्ण न करणाऱ्या तिबेटीयन मार्केटमधील एका चायनीज विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयास बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडला़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरसबल बहादूर कुंवर (४३, किशोरचंद अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर) यांचे शरणपूर रोडवरील तिबेटीयन मार्केटमध्ये चायनीज विक्रीचे दुकान आहे़ दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास कुंवर दुकानावर काम करीत असताना संशयित विशाल शिरसाठ, जेम्स मायकल, सनी मोहिते, दीपक कांबळे, राजेश जेम्स, अजय पाटणकर, केशव वाधवा, विकास वाघमारे, चंदू दायजी, संदीप हे अन्य दहा साथीदारांसह आले़ त्यांनी दंगा करीत कुंवर यांच्याकडे दिवाळीसाठी २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ मात्र खंडणीची पूर्ण रक्कम न दिल्याने संशयितांनी ‘तू जॉय कांबळे याचा आदेश मानला नाही तर तुला संपवून टाकू’ अशी धमकी देऊन लोखंडी रॉड, दगडाने कुंवर यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ यानंतर त्यांची पत्नी व मुलास मारहाण करीत विनयभंग केला़ तसेच दुकानातील खुर्च्या, टेबल व टपरीचे नुकसान केले़
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली़ या प्रकरणी कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी वीस संशयितांविरोधात खंडणी, गैरकायद्याची मंडळी, दंगल, दहशत माजविणे, मारहाण करण्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Councilor son ransom in the name of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.