नगरसेवकाने वाटले गरजूंना किराणा किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:04 PM2020-04-18T17:04:19+5:302020-04-18T17:05:48+5:30
निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला. कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. शिवाय आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.
निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला.
कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. शिवाय आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.
निफाडमधील गरजू कुटुंबाची यादी तयार करून त्यांना आणि निफाड येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे थांबलेल्या परप्रांतीय मजुरांना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, किरण कापसे यांच्या हस्ते या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये ५ किलो गहू आटा, २ किलो साखर, २ किलो शेंगदाणे, २ किलो तांदूळ, १ किलो शेंगदाणा तेल, तूरडाळ, मुगदाळ, मठ प्रत्येकी अर्धा अर्धा किलो, मिठपुडी, मिर्ची पावडर, हळद एक एक पॅकेट, जिरा पाव किलो, चहा पावडर पाव किलो, २ डेटॉल साबण, एक रिन साबण, एक टूथ पेस्ट, खोबरेल तेल पाऊच या साहित्याचा समावेश आहे.
कापसे यांनी आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.
हा उपक्र म उपक्र म यशस्वी करण्यासाठी विक्र म रंधवे, बापू कापसे, तुकाराम उगले, प्रथमेश कापसे, रावसाहेब कुंदे यांचे सहकार्य लाभले. निफाडमधील गरजू नागरिकांना सदर किराणा किटचे यापुढे वाटप चालू राहणार असल्याचे कापसे यांनी सांगितले.