त्र्यंबकेश्वरला पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:52 PM2018-10-26T15:52:49+5:302018-10-26T15:53:09+5:30

त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना

Councilors protest against setting up a water meter for Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वरला पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

त्र्यंबकेश्वरला पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : मुख्याधिका-यांवर लाभाचा संशय

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. नगरपालिकेने ठराव करून पाणी मीटरला विरोध केलेला असतानाही मुख्याधिकाºयांनी त्यासाठी निविदा काढल्यामुळे यात त्यांचा वैयक्तिक लाभ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती असताना मुख्याधिकाºयांनी मीटरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नगरपालिकेच्या ३ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी ठरावाद्वारे त्यास विरोध केला आहे. शहरातील नागरिकांना महागड्या दराने पिण्याचे पाणी परवडणारे नाही. नगरपालिकेस नगर विकास सप्ताहाच्या निमित्ताने अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून नागरिक व भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मुख्याधिकाºयांकडून या अडीच कोटी रुपयांचा वापर महागडे पाणी मीटर खरेदी करण्यासाठी केला जात आहे. त्यासाठी त्यांनी जाहिरात देऊन निविदाही मागविल्या आहेत. पाणी मीटर बसविण्यास जिल्हाधिकाºयांची संमती असल्याचे दाखवून दिशाभूल केली जात असून, नगरपालिकेच्या संपत्तीचा आपल्या अट्टहासासाठी दुरुपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे. नगरपालिकेने २५ ते ३० नागरिकांना २४ तास स्पेशल कनेक्शन दिले आहे; मात्र अद्याप त्यांना तासभरदेखील पाणी मिळालेले नाही. यापूर्वीही नागरिकांना दीड हजार रुपयांप्रमाणे पाणी मीटर घेण्यास भाग पाडले होते. त्या मीटरचे काय झाले याची चौकशी करावी व मीटर योजना लागू करू नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, अनिता बागुल, विष्णू दोबाडे, शिल्पा रामायणे, शीतल उगले, कैलास चोथे, माधवी भुजंग, सायली शिखरे, संगीता भांगरे, भारती बदादे, सागर उजे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Councilors protest against setting up a water meter for Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.