दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:45 AM2019-05-26T00:45:14+5:302019-05-26T00:45:39+5:30
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नाशिक व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागांतर्गत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकमधील शासकीय कन्या विद्यालयात करिअर मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नाशिक : प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नाशिक व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागांतर्गत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकमधील शासकीय कन्या विद्यालयात करिअर मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद््घाटन डाएटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्र्रकांत साळुंखे व बाबासाहेब बडे, कैलास सदगीर, अधिव्याख्याता डाएट सांख्यकीय सहायक सुनीता पाटील व समुपदेशक किरण बावा यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून, यामाध्यमातून विद्यार्थ्यांना जूनअखेरपर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिक यांच्यामार्फत मोबाइलद्वारे घेण्यात आलेल्या कलचाचणी व अभिक्षमता चाचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना दहावी व बारावीनंतर पुढे काय? ताणतणाव व्यवस्थापन तसेच त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम निवडीसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा समन्वयक तथा डाएटचे अधिव्याख्याता बाबासाहेब बडे व समुपदेशक किरण बावा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आला आहे. शासनाच्या सुविधेचा लाभ अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक डॉ. वैशाली झनकर व व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागप्रमुख भगवान खारके यांनी केले आहे.
व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागात प्रतिनियुक्तीवर दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक विभागात एक समुपदेशक रुजू झाले आहे. यात परीक्षा कालावधीत येणारे ताणतणाव, एकाग्रता वाढविणे, आत्महत्यासारख्या प्रकाराणांपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी व्याख्यानाद्वारे प्रबोधन, अभ्यासविषयक समस्या, दहावी व बारावी नंतर पुढील करिअरविषयी मार्गदर्शन व समुपदेशन, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, शाळा शाळांमध्ये जाऊन करिअर विषयी व्याख्यानांचे आयोजन, विद्यार्थी व पालकांसाठी मोबाइलद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन सेवा देणे अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.
कलचाचणीत फाइन आर्टला पसंती
राज्यात १६ लाख १५ हजार मुलांनी कलचाचणी व अभिक्षमता चाचणी दिली. या कलचाचणीतून समोर आलेल्या अहवालात विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती फाइन आर्ट व दुसरी पसंती कॉमर्स शाखेला दिल्याचे समुपदेशक किरण बावा यांनी सांगितले. त्याप्रमाणे विद्यार्थी व पालकांना दहावी व बारावीनंतर पुढे काय? ताणतणाव व्यवस्थापन तसेच त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम निवडीसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे.
समुपदेशन विभागाची स्थापना
व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था हे विभागीय कार्यालय शासनाने बंद करून त्याचे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विलिनीकरण केले असून, त्या अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागात प्रतिनियुक्तीवर दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक विभागात एक समुपदेशक रुजू झाले आहे.