परिचर पदोन्नतीसाठी राबविणार समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:57 AM2018-12-14T00:57:26+5:302018-12-14T00:57:49+5:30

जिल्हा परिषदेतील परिचर पदोन्नतीबाबत अनेक अडणीनंतर आता प्रशासनाने याबाबतची कारवाई सुरू केली आहे. शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानंतर आता परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती मिळणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पदस्थापनेसाठी समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र समुदेशनाच्या नावाखाली पदस्थापना लादली जाण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

Counseling implemented for the attendant promotion | परिचर पदोन्नतीसाठी राबविणार समुपदेशन

परिचर पदोन्नतीसाठी राबविणार समुपदेशन

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : समुदेशात हवी बोलण्याची संधी

नाशिक : जिल्हा परिषदेतील परिचर पदोन्नतीबाबत अनेक अडणीनंतर आता प्रशासनाने याबाबतची कारवाई सुरू केली आहे. शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानंतर आता परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती मिळणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पदस्थापनेसाठी समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र समुदेशनाच्या नावाखाली पदस्थापना लादली जाण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पात्र कर्मचाºयांचे मूळ कागदपत्र तपासणी तसेच पदोन्नतीने पदस्थापना देणेसाठी समुपदेशन प्रक्रि या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांना परिचर (गट -ड) संवर्गातून कनिष्ठ सहायक लिपिक (गट क) संवर्गात पदोन्नती देण्यात येते. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील पत्रानुसार सदरची प्रक्रि या राबविण्यात येणार असून यासाठी दि.१७ रोजी सर्व पात्र कर्मचाºयांना कागदपत्रासह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी १० वाजता होणाºया या प्रक्रियेमध्ये पदोन्नतीने पदस्थापना देण्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन विभागाने पात्र उमेदवारांची यादी तयार केली असून, यापूर्वी पदोन्नतीस नकार दिलेल्या कर्मचाºयांचा देखील यादीत समावेश आहे.
समुपदेशनासाठी येताना सर्व संबंधितांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणणे आवश्यक असून, एखादा कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यास उपलब्ध रिक्त पदांमधून पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच अशाप्रकारे केलेल्या पदस्थापनेत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
समुपदेशाविषयीच शंका
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाºया समुदेशन प्रक्रियेत संबंधितांना बोलण्याची किंवा निवडीचे स्वातंत्र्य दिले जात नसल्याचा अनुभव असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे समुपदेशन म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून पदोन्नतीची बदली लादली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. समुपदेशानमध्ये दुहेरी संवाद व्हावा आणि परिचरांची भूमिकादेखील समजून घेण्याची मागणी होत आहे.
रिक्तपदांची माहिती
परिचर पदोन्नसाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागविली जात आहे. काही तालुक्यांकडून माहिती प्राप्त झाली असून, आणखी काही तालुक्यांकडून माहिती उपलब्ध होणे बाकी असल्याचे समजते. दरम्यान, किती परिचरांना पदोन्नतीची संधी मिळणार, यामध्ये आणखी काही परिचर समाविष्ट करण्यात आले आहेत का याविषयी संभ्रमावस्था आहे. रिक्त जागा आणि परिचर पदोन्नीचा आकडा याविषयी अद्याप कोणताही खुलासा नसल्याने पदोन्नतीविषयी परिचरांमध्ये आनंदापेक्षा संभ्रमच अधिक आहे.

Web Title: Counseling implemented for the attendant promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.