पोलिस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:01 PM2020-05-21T21:01:55+5:302020-05-21T23:24:28+5:30

मालेगाव: कोरोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचारी बांधवांचा ताणतणाव कमी व्हावा याकरीता त्यांचे समुपदेशन केले जात आहे. म. स. गा. महाविद्यालय समुपदेशक केंद्राचे समुपदेशक व रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील हे स्वत: समुपदेशनाची विनामूल्य सेवा देत आहेत.

 Counseling of police personnel | पोलिस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

पोलिस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

googlenewsNext

मालेगाव: कोरोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचारी बांधवांचा ताणतणाव कमी व्हावा याकरीता त्यांचे समुपदेशन केले जात आहे. म. स. गा. महाविद्यालय समुपदेशक केंद्राचे समुपदेशक व रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील हे स्वत: समुपदेशनाची विनामूल्य सेवा देत आहेत. बंदोबस्तासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणे, स्वत:च्या कुटुंबाची चिंता, काळजी, सोबतच काम करताना येणारा ताण- तणाव, जनतेचा प्रतिसाद, इतर ठिकाणी पोलीस व डॉक्टर्स वर होणारे हल्ले या सर्व परिस्थिती बरोबरच स्वत: सोबतच जनतेची सुरक्षा सांभाळणे, या सर्वांमुळे येणारा मानिसक ताण तणाव, चिडचिडेपणा, नैराश्य घालवून कर्तव्य करणे, मनस्थिती सांभाळत जनतेचे संरक्षण करण्यासाठी त्यांचेशी संवाद साधणे यावर समुपदेशन केले जात आहे.
प्रा. पाटील हे पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया बंदोबस्ताच्या विविध पॉर्इंट ला जाऊन तेथे असणाºया पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
आतापर्यंत त्यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन, रावळगाव नाका , मोची कॉर्नर, गवती बंगला, लोढा मार्केट, सरदार चौक, टेहरे चौफुली अश्या विविध पोलीस पॉर्इंट ला जाऊन समुपदेशन केले आहे.

Web Title:  Counseling of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक