जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्यांबाबत समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:11 AM2019-05-31T01:11:31+5:302019-05-31T01:13:58+5:30
नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या ३१ मेअखेर बदल्या करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी शुक्रवारी समुपदेशन ठेवले असून, त्यात जिल्ह्यात संवर्गनिहाय व तालुकानिहाय रिक्त असलेल्या जागा व बदलीपात्र कर्मचाºयांची माहिती सादर करून कर्मचाºयांना सोयीचे ठिकाण निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या ३१ मेअखेर बदल्या करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी शुक्रवारी समुपदेशन ठेवले असून, त्यात जिल्ह्यात संवर्गनिहाय व तालुकानिहाय रिक्त असलेल्या जागा व बदलीपात्र कर्मचाºयांची माहिती सादर करून कर्मचाºयांना सोयीचे ठिकाण निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मविप्रच्या वाघ गुरुजी शाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या उपस्थितीत प्रत्येक खाते प्रमुख आपल्या विभागाची माहितीचे सादरीकरण करणार आहे. त्यात प्रामुख्याने आदिवासी व बिगर आदिवासी भागातील रिक्त जागा, अशा जागांवरील बदली पात्र कर्मचारी, प्रशासकीय व विनंतीनुसार बदली करू इच्छिणाºयांना यात सामावून घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत फक्त दहा टक्के बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रदान केले आहेत. त्यानुसार माहिती गोळा केली जात होती. त्यात आदिवासी व बिगर आदिवासी असे दोन वर्गीकरण करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे, समाजकल्याण, महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन या विभागांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात रिक्त असलेल्या जागांची माहिती बदलीपात्र कर्मचाºयांना दिली जाईल व तेथे बदलून जाण्यासाठी तयार असलेल्या; परंतु ज्येष्ठ कर्मचाºयाला प्राधान्य देण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाºयांमध्ये बिगर आदिवासी भागात जाण्यास शक्यतो कोणी तयारी दर्शवित नाही, प्रत्येकाला सोयीच्या बदल्या हव्या असतात. अशावेळी कर्मचाºयांना रिक्त पदे, तालुक्याचे ठिकाण समुपदेशनातून कळण्यास मदत होणार आहे. शिक्षकांचे मॅपिंग सुरू या बदल्यांमधून शिक्षक व मुख्याध्यापकांना मात्र वगळण्यात आले आहे. शिक्षकांच्या बदल्या शासनाने आॅनलाइन केल्या असून, त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच शाळांचे आॅनलाइन मॅपिंग केले जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांना आॅनलाइन बदल्यांसाठी अर्ज सादर करता येणार आहे.