सुरत-हैदराबाद महामार्गासाठी निफाड, सिन्नर तालुक्यात मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:12 AM2018-12-09T00:12:54+5:302018-12-09T00:23:39+5:30
नायगाव : नागपूर समृद्धी महामार्गानंतर नाशिक जिल्ह्यातून आता सुरत -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गही जाणार असून, केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. निफाड व सिन्नर तालुक्याच्या काही भागात या मोजणीचे काम सुरू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाची मोजणी झालेल्या ठिकाणी निशाणी म्हणून लावलेले सीमेंटचे ब्लाँक दाखविताना संतोष बोडके, साहेबराव बोडके, मुरलीधर कातकाडे, शंकर बोडके, शिवाजी बोडके, राजू जाधव आदी शेतकरी.
नायगाव : नागपूर समृद्धी महामार्गानंतर नाशिक जिल्ह्यातून आता सुरत -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गही जाणार असून, केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. निफाड व सिन्नर तालुक्याच्या काही भागात या मोजणीचे काम सुरू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गासाठी निफाड तालुक्यातील सावळी, पिंपळगाव निपाणी आदी गावांच्या शिवारातून गुरुवार पासून मोजणीला सुरू झाली असून, मोजणी झालेल्या ठिकाणी सीमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. मोजणीच्या कामामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.
निफाड तालुक्यातून पुढे हा मार्ग सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री मार्गे संगमनेर तालुक्यातील लोणी, राहुरी विद्यापीठ , सडे, खंबाळा, वांबोरी मार्गे नगर तालुक्यात हा राष्टÑीय महामार्ग जाणार आहे.
सदरचा राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत केला जाणार असून, जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनी या महामार्गात जाणार असल्याचे बोलले जात आहे. किमी लांबीत होणाºया या महामार्गाची रु ंदी तब्बल १२० मीटर राहणार आहे. मात्र यासाठी २५० मीटर रुंदीचे भूसंपादन केले जाणार आहे. सदरचा महामार्ग जमिनीपासून सुमारे १५ फूट उंचीवर राहणार आहे.
या महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात
आले आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील काही गावांत सर्वेक्षण झाले आहे. (पान ३ वर)
मागील आठवड्यात लोणी, राहुरी विद्यापीठ, सडे, खंडाळा, वांबोरी ते नगर तालुक्यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, शेंडी , पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी ते वाळुंजपर्यंत सर्वेक्षण करण्यात येऊन सीमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहेत. निफाड तालुक्यातील सावळी येथील निवृत्ती हरी बोडके, राजेंद्र एकनाथ बोडके, मंगला भीमराव दराडे, साहेबराव फकिरा सानप, संपत फकिरा सानप, साहेबराव सबाजी बोडके, पांडुरंग एकनाथ बोडके, खंडेराव दामू बोडके, शिवाजी बळवंत जाधव, शिवाजी फकिरा सानप, मुरलीधर सबाजी बोडके, भाऊसाहेब लक्ष्मण बोडके, भाऊसाहेब मुरलीधर कदम, काशीनाथ भिकाजी बोडके, चंद्रभान हरी बोडके आदी शेतकºयांच्या शेतात पिवळ्या रंगाचे जीपीएस जी टु असे लिहिलेले ब्लाँक बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये या महामार्गाच्या संभाव्य कामामुळे बागायती क्षेत्र असलेले अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे मोजणीच्या निशाणीवरून दिसत असल्याने खळबळ उडाली आहे. सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची सावळी व पिंपळगाव निपाणी या ठिकाणी मोजणी सुरू आहे. मात्र या परिसरातील शेतकºयांना मोजकेच क्षेत्र असून सर्वच बागायती आहे. आमच्या बागायती क्षेत्रातून हा मार्ग जात असल्याने
आम्ही या मार्गाला इंचभरही जागा देणार नाही.
- राजेंद्र बोडके, साहेबराव बोडके,
शेतकरी, सावळी, ता. निफाड