बनावट औषधे विक्रेत्यांना अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:22 PM2020-01-22T23:22:38+5:302020-01-23T00:22:49+5:30
द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.
नाशिक : द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र बºयाच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांची काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याचे पाहूनच द्राक्षबागांसाठी लागणारी विविध प्रकारची औषधे पुरविणाºया कंपन्या उदयास आल्या असून, त्यात प्रामुख्याने मण्यांची फुगवणी व आकार वाढविण्यासाठी सीपीपीयू व पीजीआर ही औषधे गुणकारी ठरली आहेत. मात्र याच औषधांच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची खुलेआम विक्री करण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला होता. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथे मे. परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या दुकानात व गुदामातून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा बनावट व विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता.
बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी हात आखडता घेतला.
परिणामी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते खुलेआम फिरत आहेत. परंतु शेतकºयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला औषधांचा साठा आरोपींनी कोठून मिळविला, त्यांनी कोठे कोठे त्याची विक्री केली, औषधे तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला या साºया बाबी गुलदस्त्यातच आहेत.
त्यामुळे कृषी खात्याने कारवाई करूनही निव्वळ पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.
कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन
बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी टाळाटाळ केल्याचे बोलले जाते.