मतमोजणीला प्रारंभ : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली गोपनियतेची शपथ !

By admin | Published: February 23, 2017 10:12 AM2017-02-23T10:12:26+5:302017-02-23T10:12:26+5:30

शहरातील दहा मतमोजणी केंद्रामध्ये असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोपनियतेची शपथ

Counting of votes: officials and employees take oath as confidentiality! | मतमोजणीला प्रारंभ : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली गोपनियतेची शपथ !

मतमोजणीला प्रारंभ : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली गोपनियतेची शपथ !

Next



नाशिक : शहरातील दहा मतमोजणी केंद्रामध्ये असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोपनियतेची शपथ घेऊन मोजणीच्या कामाला प्रारंभ केला आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणूकीच्या मतदानाची मोजणी सुरू झाली आहे. शहरातील दहा मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे सर्वच उमेदवारांचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी देखील केंद्रांमध्ये पोहचले आहेत. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात चार किलोमीटरपर्यंत पोलिसांनी बॅरेकेडिंग केले असून जॅमर लावण्यात आलेला आहे. भ्रमणध्वनी घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश बंदी आहे. जॅमर लावण्यात आल्यामुळे केंद्राच्या परिसरात मोबाईल नेटवर्किंग सेवा ठप्प झाली आहे.

Web Title: Counting of votes: officials and employees take oath as confidentiality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.