देशसेवा हाच सैनिकाचा खरा धर्म - कर्नल उपेंद्र कुशवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:54 PM2020-03-10T12:54:39+5:302020-03-10T13:02:05+5:30
देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले. त्यांनी सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
नाशिक : देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले.
भारतीय सेनादलाच्या भरतीत निवड झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच त्यांनी विद्याथ्यार्थ्यांना सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर एन. सी. सी. अधिकारी लेफ्टनंट संदीप भिसे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण कालावधीत आरोग्याची काळजी घेणे, कोणतीही शारीरिक दुखापत होऊन देणे , मनोबल सक्षम व उच्च ठेवणे, आपसात प्रेमाची भावना, आपुलकी जोपासणे व देशभक्ती सदैव जागृत ठेवणे या गुणांची संवर्धन करणे गरजेचे आहे . तसेच तुमच्यावर घर परिवाराची जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. याकरिता स्वच्छ चारित्र्य ठेवणे गरजेचे आहे. सैनिक गणवेशाचा सन्मान करणे याही महत्त्वपूर्ण गोष्टींचा त्यांनी उल्लेख त्यांनी केला. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणे व आपसात कोणत्याही पातळीवर भेदभाव न करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म , नाते, राजकारण, लिंग यावर कोणताही भेदभाव न करता एकोप्याने, एकजुटीने शिस्तीने प्रशिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला देतानाच भारतीय सैन्यदलात राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रशिक्षण सर्वोच्च स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नासिक चे प्रशासकीय अधिकारी कर्नल अलोक कुमार सिंग , बीएचएम रफिक सर , पीआय स्टाफ आदी यावेळी उपस्थित होते.