देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:53 PM2020-09-14T17:53:03+5:302020-09-14T17:53:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकली जात आहे.
खरीप हंगामात परिसरात मका, सोयाबीन, बाजरी आदी पिकाबरोबर नगदी पिकात पोळ (लाल) कांद्याची देखील लागवड केली जाते. मात्र सतत बदलते हवामान व अती पर्जन्यामुळे कांदा रोप व लागवड केलेल्या कांद्यावर मूळकूज व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक नष्ट झाली आहे. तर टाकलेली कांदा रोपे सडून पातळ झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
तणांचा प्रादुर्भाव देखील मोठया प्रमाणात वाढला आहे. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होते. परिणामी मिळेल तेथे व कंपनी बियाणे तिप्पट दराने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दरम्यान वाचलेली कांदा रोपे व कांद्याचे पीक जतन करण्यासाठी विविध महागडे रासायनिक औषधांची फवारणी करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.