देशमाने येथे केंद्रस्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:46 PM2019-01-03T21:46:18+5:302019-01-03T21:49:30+5:30

देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

Country-wide ZP-President Cup tournament will be held here | देशमाने येथे केंद्रस्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

देशमाने प्रा. शाळेत जि. प. केंद्रस्तरीय स्पर्धा बिक्षस वितरण प्रसंगी केंद्र प्रमुख केदारे, मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, आदी.

Next
ठळक मुद्देविविध प्रकारच्या स्पर्धात सहभाग

देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहभागी झालेल्या शाळातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, वकृत्व, वैयिक्तक आणि समुह गायन, वैयक्तिक आणि समुह नृत्य, धावणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धात सहभाग घेतला होता.
विजयी स्पर्धक ....
वक्तृत्व स्पर्धा-समीक्षा उगले (सत्यगाव), दुर्गा दुघड (देशमाने), चित्रकला स्पर्धा-सार्थक चव्हाण (माळवाडी), स्नेहल दराडे (सत्यगाव), २०० मी. धावणे मुले-सार्थक चव्हाण (माळवाडी), १०० मी.धावणे मुली - ऋतुजा खडके (माळवाडी), राधा खुरसने (देशमाने खु ), सावनी जगताप, वैयक्तिक गीत गायन-कृष्णा शिंदे (माळवाडी), रुद्र कुंभकर्ण, वैयक्तिक नृत्य-काजल शिंदे (मुखेड), ज्ञानेश्वरी दराडे (सत्यगाव), सामूहिक गीत गायन स्पर्धा-मुखेड, देशमाने (बु), दत्तवाडी प्रा. शाळा, सामूहिक नृत्य-मुखेड, सत्यगाव, मानोरी (बु) प्रा. शाळा.
यावेळी छगन आहेर, सरपंच विमल शिंदे, उपसरपंच रोहिणी गोरे, अध्यक्ष भानुदास बोरसे, अशोक दुघड, गोसावी गुरु जी, संदिप दुघड, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे तसेच देशमाने केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन अनिल महाजन यांनी केले. दादासाहेब बोराडे यांनी कार्यक्र माच्या शेवटी आभार मानले.
कार्यक्र म यशस्वतेसाठी सुनिल मखरे, संजय सोनवणे दादासाहेब बोराडे, अनिल महाजन, जिजा जावळे, मनिषा खैरनार, सुनिता बुवा, धनश्री वडनेरे यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Country-wide ZP-President Cup tournament will be held here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.