देशमाने जि. प. शाळेचा शतक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:26 PM2018-12-18T16:26:26+5:302018-12-18T16:27:53+5:30
देशमाने : जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे. देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते.
देशमाने :
जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे.
देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अशोक दुघड होते.
समाज खूप चांगला आहे, समाजाने कुणावरही विसंबून न राहता गावच्या विकासासाठी स्वयंपूर्ण बनले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्याचे उदाहरण देत तेव्हाचा काळ निश्चित चांगला होता कारण ते माणसाला जगायला शिकवत होते ते जातीपातीचे राजकारण करत नव्हते.
गावात पिण्यास चांगले पाणी असावे, वापरलेले पाणी जमिनीत मुरवा, झाडे लावा, शौचालयाचा वापर करा, सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, अन कुटुंबातील प्रत्येकाने गोडीगुलाबीने वागले पाहिजे. वरील सहा सुत्रामुळे माझे पाटोदा गाव सुजलाम-सुफलाम बनल्याचे पेरे पाटलांनी सांगितले. गावविकासाठी शासनाकडून विविध योजना कार्यान्वित असून देखील त्या जनतेपर्यंत पोहचत नसल्याची खतं देखील त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी केले.