कलशारोहणानिमित्त देशमानेत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:19 AM2018-03-31T01:19:20+5:302018-03-31T01:19:20+5:30
येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे असून, कलशा-रोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सुरु वात करण्यात आली आहे.
देशमाने : येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे असून, कलशा-रोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सुरु वात करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात श्री गणेश पुराण कथेवर स्वामी शिवगिरी महाराज (त्र्यंबकेश्वर) यांचे प्रवचन होणार आहे. शुक्रवारी (दि. ३० ) रोजी सकाळी ८ वा. मुखेड फाटा ते देशमानेपर्यंत ढोलताशांच्या गजरात कलश व ध्वज मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत होम व वेदपठण करण्यात आले. शनिवारी (दि. ३१) सकाळी ९ ते १ पर्यंत मंदिर वास्तूपूजन होम, दुपारी ३ ते ६ कलशपूजन होम, सायं.६ ते ८ वा. दीपपूजन आरती व ८ ते ११ प्रवचन होईल. रविवारी (दि. १) रोजी सकाळी ८ ते १ वा. होम, कलशारोहण सोहळा, ध्वजस्थापना, आरती-प्रार्थना, दुपारी १२ ते १ दरम्यान प्रवचन व महाप्रसादाने सांगता होणार आहे. दरम्यान, कार्यक्र मात सहभागी होऊन लाभ घेण्यासाठी देशमाने ग्रामस्थ व मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.