कुंदेवाडीत नम्रता पॅनलने घडविले सत्तापरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 08:19 PM2021-01-20T20:19:43+5:302021-01-21T00:48:28+5:30

मुसळगाव : सिन्नर शहरालगतच्या कुंदेवाडी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होऊन नम्रता पॅनलने सत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व गाजवत सत्ता परिवर्तन घडवून आणले.

A coup d'etat was held by the Namrata panel in Kundewadi | कुंदेवाडीत नम्रता पॅनलने घडविले सत्तापरिवर्तन

कुंदेवाडीत नम्रता पॅनलने घडविले सत्तापरिवर्तन

Next
ठळक मुद्देसत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व

मुसळगाव : सिन्नर शहरालगतच्या कुंदेवाडी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होऊन नम्रता पॅनलने सत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व गाजवत सत्ता परिवर्तन घडवून आणले.
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत तज्ज्ञ संचालक असलेले नामकर्ण आवारे व कमलाकर पोटे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी व औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात व्यवस्थापक असलेले सुरेश कु-हाडे, भाऊसाहेब नाठे, संजय गाडेकर, रवींद्र माळी, संजय माळी, सुधाकर गोळेसर, शिवाजी आवारे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटांनी कुंदेवाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या ठिकाणी ग्रामविकास पॅनल व नम्रता पॅनलमध्ये सरळ लढत झाली. प्रभाग एकमध्ये सचिन गोळेसर, मीना नाठे, योगिता नाठे, प्रभाग दोनमध्ये सुनील माळी, निर्मला माळी व शितल दोडके तर प्रभाग तीनमध्ये भाऊराव माळी, सरला सोनवणे, प्रभाग चारमध्ये रतन नाठे, विष्णू माळी आणि मनिषा माळी हे विजयी झाले.

 

Web Title: A coup d'etat was held by the Namrata panel in Kundewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.