पोलीस असल्याची बतावणी करून दाम्पत्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:26 AM2021-02-18T04:26:41+5:302021-02-18T04:26:41+5:30
चास येथील सदाशिव गोविंद भाबड व त्यांची पत्नी मीनाबाई या महाजनपूर येथे नातेवाइकांकडे जात असताना पल्सर मोटारसायकलीहून २५ ते ...
चास येथील सदाशिव गोविंद भाबड व त्यांची पत्नी मीनाबाई या महाजनपूर येथे नातेवाइकांकडे जात असताना पल्सर मोटारसायकलीहून २५ ते ३० वयोगटातील दोन युवकांनी येऊन भाबड यांची दुचाकी थांबवली. तुमच्या पिशवीत गांजा व चरस असल्याचे सांगून आम्ही पोलीस असून, तुमची झडती घ्यावी लागेल, असे सांगितले. पुढे अडचण आहे, तुमच्या सोन्याच्या अंगठ्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगितले. त्यानंतर दाम्पत्याने सोन्याच्या दोन अंगठ्या पिशवीत काढून ठेवल्या. या अंगठ्या असलेली पिशवी घेऊन दोघे भामटे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे भाबड दाम्पत्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात जाऊन आपबीती कथन केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.