अपघातात दांपत्य जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:32 IST2020-12-26T22:39:35+5:302020-12-27T00:32:43+5:30
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर हॉटेल साईसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्य जखमी झाले आहे. शनिवारी (दि. २६) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात दांपत्य जखमी
ठळक मुद्देउपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले.
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर हॉटेल साईसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्य जखमी झाले आहे. शनिवारी (दि. २६) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
दशरथ रघुनाथ पवार (४५ ) व पत्नी जनाबाई ( ४०, रा. पेठ, हल्ली मुक्काम मालखेडे, ता. कोपरगाव) हे मोटारसायकलने (एमएच १५ जीडी ०७३१) जात होते. अज्ञात वाहनाने कट दिल्याने अपघात झाला. त्यांना रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले.