पतंगबाजीचे शौर्य, पक्ष्यांसाठी क्रौर्य

By admin | Published: January 5, 2017 02:06 AM2017-01-05T02:06:27+5:302017-01-05T02:06:43+5:30

संकल्प : ‘नायलॉन मांजा टाळूया, मोकळे आकाश देऊया’

Courage of kite, cruelty for birds | पतंगबाजीचे शौर्य, पक्ष्यांसाठी क्रौर्य

पतंगबाजीचे शौर्य, पक्ष्यांसाठी क्रौर्य

Next

अझहर शेख नाशिक
आगामी मकर संक्रांत सणाच्या औचित्यावर आकाशात आतापासूनच पतंगांची गर्दी होऊ लागली आहे. पतंगबाजीचे शौर्य नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसाठी क्रौर्य ठरू लागले आहे. नव्या वर्षात निसर्गाचा हा खरा दागिना अधिक सुरक्षित कसा राहील, यादृष्टीने कृती करण्याची गरज आहे.
पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा होणारा वापर जसा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणारा आहे तसाच माणसांसाठीही जिवावर बेतणारा आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नायलॉन मांजाची विक्री व वापरावर निर्बंध आणले आहेत. चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून कारवाई जरी सुरू असली तरी काही विक्रेते नायलॉन मांजा विकतात आणि त्यांना मिळणारा ग्राहकवर्गही चोरट्या मार्गाने मांजा खरेदी करून पतंगबाजीच्या क्रौर्यामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. दरवर्षी शेकडो पक्षी आकाशात नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून गंभीररीत्या जखमी होऊन तडफडत प्राण सोडतात. पाच ते दहा रुपयांची पतंग कापली जाण्याच्या चिंतेपोटी युवक नायलॉन मांजा हातात घेतात आणि मानवाबरोबरच पक्ष्यांचाही जीव धोक्यात घालतात. नायलॉन मांजाने माणूस एकदा गंभीर जखमी होत असला तरी हा मांजा वीजतारा, झाडांच्या फांद्यांमध्ये वर्षानुवर्षे अडकून राहतो आणि पक्ष्यांच्या पंखांना नेहमीच त्यापासून दुखापत होत असते. झाडांवर पक्षी अडकले किंवा उलटे लटकून तडफडत असल्याचे ‘रेस्क्यू कॉल’ अग्निशामक मुख्यालयात संक्रांतीपासून कायमस्वरूपी सुरू होतात.

Web Title: Courage of kite, cruelty for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.