वेळुंजेत तहसीदारांनी केली नुकसान झालेल्या शेतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:13 PM2019-11-02T18:13:51+5:302019-11-02T18:14:24+5:30
वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,
वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दृष्टीने वेळुंजेत सर्वात मोठे भात क्षेत्र असून 90त्न नुकसान झाले आहे. त्याच पाशर््वभूमीवर आज तालुक्यातील तहसीलदार व कृषीअधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाहणी दौरे केले.
वेळुंजे त्र्यंबकेश्वर येथे पावसाने नुकसान झालेल्या भागाचे निरीक्षण करताना तहसिलदार दिपक गिरासे, कृषीधिकारी वळवी, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, कृषी सहाय्यक प्रमोद ढोकचौळे, सरपंच गोपाळा उघडे, नवनाथ बोडके, बाळू बोडके, सोनू बोडके, रंगनाथ काशीद, नंदू बोडके आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व यंत्रणा कामाला लावली असून नुकसान झालेले क्षेत्र नुकसान भरपाईत कसे येईल याकडे संपूर्ण लक्ष दिले जाईल, व आम्ही सर्व अधिकारी यावर नजर ठेवून असल्याचे प्रतिपादन यावेळी मा तहसीलदार यांनी केले.
अतिपावसाने त्र्यंबकेश्वर सह तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती आहे , पावसाने शेतीची पार नासाडी करून टाकली आहे तरी प्रशासन हे काळजी घेत आहे परंतु सगळे नुकसान ग्रस्त कसे बसतील याच्या कडे प्रशासनाने लक्ष घालावे , अशी विनंती शिवसेनाच्या वतीने प्रशासनाला केली आहे,
- समाधान बोडके पाटील, शिवसेना समन्वयक, त्र्यंबकेश्वर.
तालुक्यातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे, यातून कोणीही नुकसान ग्रस्त वंचित राहणार नाही. याची काळजी आम्ही तालुक्या स्तरावर घेत आहोत. तरी शेतकर्यांनी सहकार्य करून योग्य ते पंचनामे करू घ्यावे,
- दिपक गिरासे, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर.