रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे

By admin | Published: November 8, 2016 11:48 PM2016-11-08T23:48:43+5:302016-11-09T00:07:35+5:30

वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळा : मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर अद्यापही फरार

Court has passed the order on the Ration Grain scam | रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे

रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे

Next

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासाबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी ग्रामीण पोलिसांवर कडक ताशेरे ओढल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ तसेच या घोटाळ्याचा मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर पोलिसांना सापडत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ दरम्यान, या घोटाळ्यातील उर्वरित चौघा संशयितांविरोधात येत्या महिनाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़
रेशन धान्य घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आॅक्टोबरमध्ये या गुन्ह्णात घोटी येथील संशयित दीपक श्रीश्रीमाळ व अन्य एकास अटक केली होती़ या दोघांचीही पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ मात्र, या कालावधीनंतर श्रीश्रीमाळ यास कोर्टात हजर केले असता तपासात प्रगती न आढळल्याने तसेच दोषारोपपत्र दाखल केले परंतु काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुद्देमाल हजर न केल्याबाबत न्यायालयाने तपास पद्धतीवर चांगलेच ताशेरे ओढले होते़ तसेच संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर संबंधित तपास अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने या प्रकरणाचा तपास पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे़
रेशन धान्य घोटाळ्यातील मास्टरमार्इंड जितूभाई ठक्करकडून माल घेणे त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याचे काम श्रीश्रीमाळ करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़
यातील संशयित जितूभाई ठक्कर हा सुमारे १७ महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही़ तसेच त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून संथपणे तपास करून पोलीस त्यास अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याची चर्चा आहे़ दरम्यान, रेशन धान्य घोटाळाप्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन,अश्विन जैन व प्रकाश शेवाळे असे एकूण तेरा आरोपी असून त्यामध्ये आणखी दोन जणांची भर पडली आहे़(प्रतिनिधी)

घोटाळ्यातील मास्टरमार्इंड जितूभाई ठक्करच्या मिळकती सरकारजमा का करण्यात येऊ नये याबाबत जाहीरनामा काढण्यात आला असून तो त्याच्या मिळकतींवर चिकटविला जाणार आहे़ या गुन्ह्णातील सर्व संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते कारागृहात आहेत़ तर उर्वरित चौघांचे दोषारोपपत्र येत्या महिनाभरात न्यायालयात दाखल केले जाईल, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्देमाल व पंचनामे पूर्ण करून सादर करण्यात आले आहेत़ या घोटाळ्यामधील आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास सुरू आहे़
- देवीदास पाटील, कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी़

Web Title: Court has passed the order on the Ration Grain scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.