जनजागृतीतून कोविड केअर कमिटीचा कोरोनाविरोधी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:07+5:302021-06-02T04:13:07+5:30

नाशिक : कोरोनाविरोधी लढ्यात नागरिकांचे प्रबोधन करून कोरोना व म्युकरमायकोसिसची लक्षणे व घ्यावयाची खबरदारी याविषयीची आवश्यक ती माहिती तज्ज्ञांच्या ...

Covid Care Committee's fight against corona through public awareness | जनजागृतीतून कोविड केअर कमिटीचा कोरोनाविरोधी लढा

जनजागृतीतून कोविड केअर कमिटीचा कोरोनाविरोधी लढा

Next

नाशिक : कोरोनाविरोधी लढ्यात नागरिकांचे प्रबोधन करून कोरोना व म्युकरमायकोसिसची लक्षणे व घ्यावयाची खबरदारी याविषयीची आवश्यक ती माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांची कोविड केअर कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून २५ ते २९ मे या कालावधीत कोरोना, म्युकरमायकोसिस, आरोग्य आदी विषयांवर ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला असून अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून कोरोनाविरोधी लढ्यात कोविड केअर कमिटीकडून लक्षणीय योगदान दिले जात आहे.

कोविड केअर कमिटीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत ऑनलाईन वेबिनारमध्ये ‘कोविड-१९ आणि इम्युनिटी’ या विषयावर डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी कोविड-१९ काळात आवश्यक असलेली इम्युनिटी, इम्युनिटीचे प्रकार, इम्युनिटीचे काम याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. आत्माराम पवार यांनी ‘औषध घ्यावे बघून’ या विषयावर बोलताना औषधांचे प्रकार- १ प्रेसक्राइब्ड प्रग्ज, नॉन -प् रेसक्राइब्ड प्रग्ज याबाबत माहिती दिली, तसेच प्रिस्क्रिप्शनचे महत्त्व, प्रिस्क्रिप्शन लिहिण्यापासून, तर त्यांचे डॉक्युमेंटेशनपर्यंतचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. मेडिसीन बिल व त्याचे फायदे तोटे, जेनेरिक मेडिसिन, ऑनलाईन फार्मसी, ओ.टी.सी.बाबतची माहिती दिली. पेनकिलर, अँटिबायोटिक औषधांचे शरीरावर होणारे दुष्परिणामही त्यांनी आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितले, तर डॉ. मयूर लांडे यांनी ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात काळी बुरशी या विषयावर मार्गदर्शन केले. जयश्री धांडे यांनी ‘सार्स कॉव्ह-२ : इन्फेक्शन पॅथोजेनेसीस अँड इंम्युन रिस्पॉन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले.

इन्फो

उपक्रमात यांचाही सहभाग...

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या कोविड केअर कमिटीत के. के. वाघ कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक व के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी महाविद्यालयांचाही समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून कोरोना, म्युकरमायकोसिससोबतच नागरिकांनी वैयक्तिक आरोग्याविषयी घ्यावयाची खबरदारी व काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासोबत कोरोना व म्युकरमायकोसिससारख्या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारांविषयी या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्त समीर वाघ यांच्या मार्गदर्शनात सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य के.एस. जैन, प्राचार्य आर. ए. हिरोळे आदींचाही सक्रिय सहभाग लाभतो आहे.

Web Title: Covid Care Committee's fight against corona through public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.