एचएएल कामगारांसाठी कोविड हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:53+5:302021-05-24T04:12:53+5:30

या हेल्पलाईनअंतर्गत एचएएल मधील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कोविड काळात बेड उपलब्धता, घरपोच मेडिसीन सुविधा, घरपोच निःशुल्क भोजन, मोफत ...

Covid helpline for HAL workers | एचएएल कामगारांसाठी कोविड हेल्पलाईन

एचएएल कामगारांसाठी कोविड हेल्पलाईन

Next

या हेल्पलाईनअंतर्गत एचएएल मधील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कोविड काळात बेड उपलब्धता, घरपोच मेडिसीन सुविधा, घरपोच निःशुल्क भोजन, मोफत ऑक्सिजन पुरवठा, गृहविलगीकरण व्यवस्था, रुग्णवाहिका व अथवा वाहन तत्काळ उपलब्ध करणे, अंत्यविधी मदतकार्य तसेच कोविडमधील प्राणायाम व योगा मार्गदर्शन आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यासाठी आठ टीम बनविण्यात आल्या असून जवळपास १०० हून अधिक स्वयंसेवक कामगार कुटे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना सेवा पुरवणार आहेत. या हेल्पलाईनची एक वेबसाईट लिंक बनविण्यात आली असून कोविडबाधित एचएएलमधील कामगारांनी त्यातील आवश्यक मदतकार्यापुढील क्रमांकांवर क्लिक केल्यास कॉल थेट संबंधित स्वयंसेवकास कनेक्ट होणार असल्याने गरजू रुग्णाला तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

कोट.....

मागील वर्षापासूनच आम्ही कामगारांना कोविडसंबंधित शक्य होईल ती मदत करत आहोत. त्यातच आता सर्वच आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देत असताना भविष्यातील धोका ओळखता एचएएल कामगारांच्या मदतीत सुसूत्रता आणण्यासाठी टीम वर्कच्या माध्यमातून काम करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच कोविड हेल्पलाईन सुरू केली.

- संजय कुटे,

माजी सरचिटणीस, एचएएल कामगार संघटना

Web Title: Covid helpline for HAL workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.