धामणगांव आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:44 PM2021-03-15T16:44:21+5:302021-03-15T16:54:09+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, वय वर्षे ४५ ते ६० उच्च जोखीम असलेल्या ६५ वर्षांवरील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी, तसेच नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस देण्यात आली.

या लसीकरणाची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेढे यांनी उपस्थितांना दिली. कोरोना रोगावर प्रतिबंधक म्हणून पहिला डोस कोविशिल्ड देण्यात येत असून, यानंतर २८ दिवसांनंतर पुन्हा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले.
लसीकरण झालेल्या सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियम मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांनी पहिली कोविशिल्ड लस घेतली.
यावेळी उपसरपंच शिवाजी गाढवे, बाळासाहेब गाढवे, नामदेवराव गाढवे नामदेव घुमरे, नवनाथ गाढवे उपस्थित होते.