भातखळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:33 PM2020-06-21T22:33:17+5:302020-06-22T00:03:09+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबाबत दुजोरा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

भातखळ्याजवळ गाय मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मान व पोटाला चावा घेतल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्या बघून गायीला बिबट्यानेच ठार केल्याचे विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात बिबटे, तरस, मोर, ससे व रानडुकरे आदी मोठ्या प्रमाणात आहेत. वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे, जलाशय राखून ठेवले आहेत. जंगलात नजीकच्या गावातील मोकाट जनावरे चरण्यासाठी गेली की ते अशा बिबट्यांच्या किंवा रानडुकरांच्या शिकार होतात. जंगल परिसर वन्यप्राण्यांसाठी संरक्षित असतो. यास्तव मालकांनी आपल्या जनावरांना मोकाट न सोडता गावातच चारावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अहिरे यांनी केले आहे.