गोंडेगावात पार पडलं गाईचे डोहाळे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:58 PM2021-06-23T16:58:08+5:302021-06-23T16:58:37+5:30
ओझर : मुक्या प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारी अनेक कुटुंबे आहेत. परंतु त्या मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, त्यांचेसुद्धा सुखाचे क्षण हे कार्यक्रम करून साजरे करावेत ही भावना जाणून गोंडेगाव ता. निफाड येथील शेतकरी दाते व तानाजी दाते बंधूंनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून आपल्या कपिला गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा पार पाडला.
सुदर्शन सारडा

हिंदू धर्मात गाईला देव मानले जाते. गोंडेगाव येथील शेतकरी दादाभाऊ दाते यांच्याकडे कपिला नावाची एक देशी गाय आहे. तिची देखभाल दाते कुटुंबीय घरातील सदस्याप्रमाणे करत असतात. कपिला ही गाय गरोदर असून त्याचे औचित्य साधून दाते कुटुंबाने कोरोन नियमाचे पालन करत सोमवारी (दि. २१) घरगुती पध्दतीने गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला.
या आगळ्यावेगळ्या डोहाळे जेवणासाठी गाईला आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. तर फराळाचे सर्व साहित्य याशिवाय पुरणपोळीचे जेवण करण्यात आले होते. दाते परिवातील महिलांनी परंपरेनुसार गाईची ओटी भरून कार्यक्रम पार पाडला. या अनोख्या कार्यक्रमाचे गावात कौतुक होत आहे.