गौरी पटांगणावर ‘गोवऱ्या’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:06 AM2019-03-13T01:06:02+5:302019-03-13T01:06:30+5:30

होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत.

The 'cowherd' is filed on the Gauri platform | गौरी पटांगणावर ‘गोवऱ्या’ दाखल

गौरी पटांगणावर ‘गोवऱ्या’ दाखल

Next
ठळक मुद्देहोलिकोत्सव : गोवऱ्या खरेदीसाठी लगबग

पंचवटी : होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत. आठवड्याभरातच होळीचा सण असल्याने गोवºया खरेदीसाठी ठिकठिकाणच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया खरेदीसाठी लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून या पटांगणावर गोवºया विक्री केल्या जात असल्याने या पटांगणाला गौरी पटांगण असे नाव पडलेले होते. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, वणी, करंजाळी या आदिवासी खेड्यापाड्यातून आदिवासी बांधव थापलेल्या तसेच रानावनातून वेचलेल्या रानशेणी गोवºया विक्रीसाठी आणतात.
गौरी पटांगणावर गोवºया विक्रेते दाखल झाले असून, रानशेणी गोवºया ५०० रुपये पोते, तर २० रुपये वाटा याप्रमाणे विक्री केल्या जात आहेत, तर हाताने थापलेल्या गोवºया ५०० रुपये शेकडा दराने विक्री केले जात असल्याचे वणी येथून गोवºया विक्रीसाठी आलेल्या सीताराम गायकवाड यांनी
सांगितले.
येत्या बुधवारी (दि.२०) होळी असल्याने त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी गंगाघाटावर येऊन गोवºया खरेदीचे काम सुरू केले आहे, तर काहीजण थेट खेड्यापाड्यात जाऊन गोवºया खरेदी करत आहेत.
गोदाघाटावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोवºया आणल्या जातात. मात्र यंदा कमी प्रमाणात गोवºया येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिकलगतच्या खेडेगाव आणि आदिवासी भागातून अनेक गोवºया विक्रीसाठी आठ-दहा दिवस आधीच मुक्कामी येतात. यंदा आदिवासी भागातून गोवºया घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसते.

Web Title: The 'cowherd' is filed on the Gauri platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.