गोठ्यास लागलेल्या आगीत गाईचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:22 PM2019-04-27T21:22:03+5:302019-04-27T21:27:32+5:30
काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील दरसवाडी (हिरापुर) शिवारातील लामखडे वस्तीवरील नागु लामखडे यांच्या गोठयाला दुपारी अचानक लागलेल्या आगीत गोठयातील गाईचा मृत्यु झाला तर म्हैस गंभीर भाजली आहे.
काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील दरसवाडी (हिरापुर) शिवारातील लामखडे वस्तीवरील नागु लामखडे यांच्या गोठयाला दुपारी अचानक लागलेल्या आगीत गोठयातील गाईचा मृत्यु झाला तर म्हैस गंभीर भाजली आहे.
दरसवाडी (हिरापुर) शिवारात लामखडे वस्तीवरील नागू लामखडे यांच्या शेतातील गोठ्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोठ्यातील गायीचा भाजून मृत्यू झाला, तर शेजारीच बांधलेली म्हैस सुमारे ८० टक्के भाजली आहे. अचानक लागलेल्या आगीने वाढलेल्या उष्णतेमुळे काही वेळातच रौद्ररुप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील शरद लामखडे, सचिन जाधव, अमोल लामखडे , भाऊसाहेब लामखडे , समाधान लामखडे , संदीप कांगुणे, अरु ण कांगुणे आदींनी घरातील पाण्याचा मारा करु न आगीवर नियंत्रण मिळवले.
सदर घटनेची माहीती मिळताच तलाठी एस. पी. नेवल यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान आगीचे कारण अदयाप समजु शकले नाही. घटनास्थळी पशु वैदयकिय अधिकारी डॉ. दत्ता मोटेगावकर, डॉ. राजेश गावरे यांनी मृृत गायीचे श्ववविच्छेदन केले.