सुरगाण्यात माकपचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:05 PM2018-09-10T13:05:42+5:302018-09-10T13:05:51+5:30
सुरगाणा : महागाई विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा देत पुकारलेल्या सुरगाणा बंदला प्रतिसाद मिळून कडकडीत बंद पाळण्यात आला.
सुरगाणा : महागाई विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा देत पुकारलेल्या सुरगाणा बंदला प्रतिसाद मिळून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आरपीआय, मनसे यांनीही पाठिंबा दिला. येथील होळी चौक व बिरसा मुंडा चौकात टायर जाळून पेट्रोल, डिझेल व अन्य वस्तूंच्या महागाई विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. दिवसागणिक पेट्रोल, डिझल, गॅस यांचे वाढलेले दर, त्यामुळे भडकलेली महागाई तसेच लागू केलेली जीएसटी, नोटबंदी, वीजदरवाढ आदीविरोधात निषेध व्यक्त करीत घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार जे. पी. गावित, इंद्रजित गावित, सुरेश गवळी, काँगेसचे तालुकाध्यक्ष सखाराम भोये, मनसेचे मनोहर खंबाईत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनार्दन भोये, आरपीआयचे रोशन पगारे यांचेसह उत्तम कडू, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, राहूल आहेर, वसंत बागुल, मनोज सोनवणे, योगेश थोरात, आनंदा वाघमारे, सुखलाल मोहिते, अबू बकर शेख, शकूर शहा आदी उपस्थित होते. बंद दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदानंद वाघमारे यांनी येथे येऊन परिस्थिती जानून घेतली. आमदार जे. पी. गावित यांनी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपिस्थतित वाघमारे यांना निवेदन दिले.