नागमणी भासवून फसवणूक : आर्थिक भरभराटीचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:17 PM2018-08-21T23:17:53+5:302018-08-22T00:25:37+5:30

नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलद-यातील सहा संशयित फासेपारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली एक लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

 Cracking fraud: Economic bait lure | नागमणी भासवून फसवणूक : आर्थिक भरभराटीचे आमिष

नागमणी भासवून फसवणूक : आर्थिक भरभराटीचे आमिष

Next

नांदगाव : नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलद-यातील सहा संशयित फासेपारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली एक लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.  धनाजी इपरकर यांचे कुरणे वस्तीवर छोटेखानी हॉटेल आहे. त्यांच्या गावाजवळ अथनी रोडला यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सातारा येथील राजू डोबे यांच्याशी इपरकर यांची मैत्री झाली. डोबे यांच्याबरोबर इपरकर नांदगाव येथे आले. तेथून अस्वलदरा येथे एका अंधाºया खोलीत चमकणारा नागमणी दाखविण्यात आला. नागमणीमुळे पैसा येतो, आर्थिक भरभराट होते, अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे प्रभावित झालेल्या इपरकरांनी नागमणी विकत घेण्याची तयारी दाखवली. आधी पाच लाख रुपये किंमत सांगितलेला तथाकथित नागमणी तडजोडीने एक लाख ६३ हजार रुपयांना विकण्यात आला.  या व्यवहारात धनाजी यांना नांदगाव येथे प्रथमच भेटलेल्या दाढीवाल्या इसमाचा रोल असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. सातारा येथील राजूचा नांदगावमधील फासे-पारध्यांशी असलेला संबंध नेमका काय, अशा प्रश्नाची उकल करण्यात नांदगाव पोलीस गुंतले आहेत. इपरकर यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी अस्वलदरा येथील सदर इसमासह अन्य पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणातले गूढ असलेला नागमणी एका अंड्यासारख्या डबीत कापसामध्ये घालून धनाजी यांना दाखविण्यात आला होता. डबी घरी नेल्यानंतर देवपूजा करून उघड अन्यथा मणीचा प्रभाव कमी होईल, असे सांगून हा नागमणी विकला होता. मात्र घरी नागमणी काही केल्या प्रकाशित होईना तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे धनाजी यांच्या लक्षात आले.

Web Title:  Cracking fraud: Economic bait lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.