खरोळी नदीवरील पुलाचे भगदाड पुन्हा उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:48 PM2020-06-22T14:48:20+5:302020-06-22T14:48:38+5:30

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर खरोळी नदी वरील पुलाचे भगदाड पुन: खुले झाले आहे. यापूर्वी दोनदा त्याची दुरु स्ती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव येथील उपविभागीय कार्यालयात तक्र ार केल्यानंतर पहिल्यांदा सिमेंट, खडी, वाळुचे मिश्रण तयार करून भगदाडावर गजाचे तुकडे टाकून बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र बुजवलेल्या भगदाडावर टाकलेले सिमेंट अल्पकाळात उडाल्याने आतले गज उघडे पडले आहेत.

The cracks in the bridge over the Kharoli River reopen | खरोळी नदीवरील पुलाचे भगदाड पुन्हा उघडे

खरोळी नदीवरील पुलाचे भगदाड पुन्हा उघडे

googlenewsNext

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर खरोळी नदी वरील पुलाचे भगदाड पुन: खुले झाले आहे. यापूर्वी दोनदा त्याची दुरु स्ती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव येथील उपविभागीय कार्यालयात तक्र ार केल्यानंतर पहिल्यांदा सिमेंट, खडी, वाळुचे मिश्रण तयार करून भगदाडावर गजाचे तुकडे टाकून बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र बुजवलेल्या भगदाडावर टाकलेले सिमेंट अल्पकाळात उडाल्याने आतले गज उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे टायरमध्ये गज घुसून अपघात होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दुरु स्तीच्या वेळेस मुरु म टाकून डागडूजी करण्यात आली होती. परंतु मागील आठवड्यात पाऊस झाल्याने हा खड्डा पुन्हा उघडा झाला आहे. बोलठाण येथे उपबाजार समिती असल्याने या रस्त्याने दररोज तीनशे पेक्षा जास्त वाहने कांदे घेऊन जातात, त्याचप्रमाणे बँक आणि पेट्रोलपंप असल्याने रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा येथे मंजुरी मिळालेल्या उंच पुलाचे तात्काळ काम सुरू करावे किंवा उघडे पडलेले गज काढून योग्य प्रकारे डागडुजी करण्यात यावी. अशी मागणी संदीप सुर्यवंशी, गुलाब चव्हाण, मारु ती सोनवणे, सचिन गंडे, प्रदिप सुर्यवंशी यांनी केली आहे.

Web Title: The cracks in the bridge over the Kharoli River reopen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक