नानेगाव येथे शेतीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:32 AM2019-04-09T00:32:27+5:302019-04-09T00:32:47+5:30

नानेगाव येथे जुन्या शेतीच्या वादावरून मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crashing of foodgrains in Nanegaon | नानेगाव येथे शेतीच्या वादातून हाणामारी

नानेगाव येथे शेतीच्या वादातून हाणामारी

googlenewsNext

नाशिकरोड : नानेगाव येथे जुन्या शेतीच्या वादावरून मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सुकदेव हरी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नानेगाव मारूती मंदिराजवळ विष्णु गेणु काळे, गेणु किसन काळे, जगन किसन काळे, दत्तु नामदेव काळे, उमाजी किसन काळे, अनिल काळे, गौरव काळे, स्वप्नील भरत काळे, वैभव दिनकर काळे, रोशन दिनकर काळे, अर्जुन काळे, दिनकर काळे यांनी जुन्या शेतीच्या वादावरून लाठ्या-काठ्या, लोखंडी गज घेऊन सुकदेव काळे व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली.
अर्जुन एकनाथ काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संदीप काळे, केशव काळे, योगेश काळे, सुकदेव काळे, छायाबाई काळे यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता जुन्या शेतीच्या कारणावरून लाठ्या-काठ्या व गज घेऊन शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात्रेत सोन्याचे दागिने लंपास
संसरीगाव येथे यात्रेत दोन अज्ञात महिलांनी लहान मुलांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओम पान काढुन चोरी केली. संसरी गाव येथील सुशांत विष्णु जाधव हे शनिवारी गावातील जत्रेत मुलगी अनुष्का हिला घेऊन गेले होते. यावेळी अज्ञात दोन चोरट्या महिलांनी अनुष्का व इतर मुलांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओम पान काढून घेऊन चोरी केली.
युवकावर हत्याराने वार
देवळालीगांव गुलाबवाडी वीटभट्टी रस्त्याजवळ युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी करण्यात आले. गुलाबवाडी येथील विकास जितेंद्र जाधव याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास वीटभट्टीरोड येथून रस्त्याने पायी जात होतो. यावेळी संशयित शैलेश दीपक वडगे (वय २२) हा विकास याच्याजवळ येऊन विकास असा आवाज देत कुठल्यातरी तीक्ष्ण हत्याराने हातावर, पोटावर, बरगडीजवळ वार करून जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crashing of foodgrains in Nanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.