जुनी पेन्शन योजनेसाठी व्यापक लढा उभारावा - मारुती तेगमपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:54 AM2019-02-25T00:54:51+5:302019-02-25T00:55:24+5:30

डीसीपीएसऐवजी जुनी फॅमिली पेन्शन योजना लागू करायची असेल तर सर्वांनी एकजूटीने व्यापक लढा उभारला पाहिजे. जनमानस तयार करु न आणि उपद्रव मूल्य दाखवले तरच सरकारला धडकी भरेल आणि ते दखल घेतील.

Create a comprehensive fight for the old pension scheme - Maruti Tegampur | जुनी पेन्शन योजनेसाठी व्यापक लढा उभारावा - मारुती तेगमपुरे

जुनी पेन्शन योजनेसाठी व्यापक लढा उभारावा - मारुती तेगमपुरे

Next

नाशिक : डीसीपीएसऐवजी जुनी फॅमिली पेन्शन योजना लागू करायची असेल तर सर्वांनी एकजूटीने व्यापक लढा उभारला पाहिजे. जनमानस तयार करु न आणि उपद्रव मूल्य दाखवले तरच सरकारला धडकी भरेल आणि ते दखल घेतील. आगामी सार्वत्रिक निवडणूकीत नो पेन्शन नो व्होट हे आपले धोरण राहील, असे प्रतिपादन राज्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन योजनेचे राज्य समन्वयक प्रा. मारु ती तेगमपुरे यांनी केले.
जिल्हा समितीतर्फे गंगापूर रोडवरील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात रविवारी डीसीपीएस धारकांचा (अंशदायी निवृत्ती वेतन योजना) मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. समन्वयक प्रा. उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, डॉ प्रदीप जायभावे, अमोल काटेगावकर, जिल्हा समन्वयक सूरजकुमार प्रसाद, प्रा. धीरज झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानोबा ढगे यांनी स्वागत तर प्रा. सुरज प्रसाद यांनी प्रास्तविक केले.
...तर म्हातारपणाची काठीच जाईल
२००५ साला नंतर सेवेत आलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना डीसीपीएस तर २००५ पूर्वीच्यांना फॅमिली पेन्शन योजना लागू झाली आहे. या योजनेचे अनेक तोटे व गोंधळ आहे. घटनेतील अधिकारानुसार सरकार जुना-नवा असा भेदभाव करु शकत नाही. सुप्रीम कोर्टानेही भेदभाव करता येणार नाही असा निकाल देऊनही सरकार कोर्टाचा अवमान करत आहे. आपण असंघटीत असल्याने सरकारचे फावते. डीसीपीएसधारकाच्या खात्यात किती पैसा जमा होतो, शासनाचा वाटा आणि व्याजदर किती याचा ताळमेळच नाही. इतर संघटनांशी समन्वय साधून व्यापक लढा उभारला तरच जुनी पेन्शन योजना लागू होईल. आज एकजूट केली नाही तर म्हतारपणाची आपली काठीच जाईल असे प्रा. तेगमपुरे म्हणाले.

Web Title: Create a comprehensive fight for the old pension scheme - Maruti Tegampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.