महापालिकेच्या दवाखान्यात साहित्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:33 PM2020-01-15T23:33:12+5:302020-01-16T00:30:20+5:30

जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्याची लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. परंतु दवाखान्यातील टेबल, खुर्च्या व साहित्य बसविण्यात आले नसल्याने दुरुस्तीसाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. त्याचबरोबर दवाखाना सुरू न झाल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असून, त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

Create materials in the municipal hospital | महापालिकेच्या दवाखान्यात साहित्यांची वानवा

महापालिकेच्या दवाखान्यात साहित्यांची वानवा

googlenewsNext
ठळक मुद्देजुने सिडको : दुरुस्ती होऊनही दवाखाना बंद; रुग्णांचे हाल

सिडको : जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्याची लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. परंतु दवाखान्यातील टेबल, खुर्च्या व साहित्य बसविण्यात आले नसल्याने दुरुस्तीसाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. त्याचबरोबर दवाखाना सुरू न झाल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असून, त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
महापालिकेच्या जुने सिडको भागातील दवाखान्यातून नागरिकांना थंडी, ताप यांसारख्या साथीच्या आजारांवर उपचार घेता येत होते. परंतु या दवाखान्याची दयनीय अवस्था झाल्याने गेल्यावर्षी शिवसेनेच्या महिला नगरसेवक कल्पना पांडे यांनी दवाखाना दुरुस्ती करण्याबाबत प्रभाग तसेच महासभेत आवाज उठविला. यानंतर झोपी गेलेल्या मनपास जाग आल्याने मनपाच्या वतीने दवाखाना दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, सदरचा दवाखाना हा गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना उपचारासाठी मनपाच्या मोरवाडी येथील दवाखान्यात जावे लागत आहे. महापालिकेच्या जुने सिडको भागातील दवाखान्यात दररोज शंभराहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असून, गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून या दवाखान्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने बंद ठेवण्यात आला आहे. आजच्या परिस्थितीत दवाखान्याचे काम हे ९० टक्के पूर्ण झाले असले तरी किरकोळ कारणास्तव हा दवाखाना अद्यापही सुरू झालेला नाही.

जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्यात दररोज परिसरातील असंख्य रुग्ण उपचारासाठी येत होते. परंतु दवाखान्याची संपूर्ण वाताहत झाल्याने दवाखान्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. याबाबत महासभा तसेच प्रभागसभेत आवाज उठवून दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने सुरू केले. परंतु केवळ दवाखान्यातील टेबल व खुर्चीचे काम बाकी असून, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कारवाई झाल्यास रुग्णांना अधिक सुविधा उपलब्ध होईल.
- कल्पना पांडे, नगरसेवक

Web Title: Create materials in the municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य