गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:16 PM2019-03-31T17:16:56+5:302019-03-31T17:18:08+5:30

चांदवड - येथील वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे तालुक्यातील गोहरणच्या वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

 Creation of artificial water animals for animals in Goharan area | गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

Next

एप्रिल महिन्याआधीच जिल्ह्यात तपमान ४० अंशावर पोहचले आहे. कडक उन्हाच्या भीषणतेने जंगलातील पाणीसाठे झपाटयाने कमी होत आहेत. गोहरण, धोंडबे हट्टी , कानमंडाळे या चांदवड तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात कमीत कमी शंभरावर हरणे आहेत. हरणे व इतर पशु हे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रस्ता ओलाडतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनास धडकून वडाळीभोई, खडकजांब परिसरात मुंबई-आग्रा हायवेवर दोन ते तीन हरीण मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून चांदवड वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे गोहरण धोडंबे येथील वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमुळे हरिण तसेच जंगलातील प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. सदर कृत्रिम पाणवठे बांधण्यासाठी वनरक्षक नवनाथ बिन्नर, अण्णासाहेब टेकनर विजय वाफाळे, आकाश गुळवे, अमोल सोनवणे, प्रविण जाधव, प्रसाद हिंगमिरे, किरण सोनवणे, प्रकाश जाधव, विशाल पवार व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Creation of artificial water animals for animals in Goharan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.