ई-पाससाठी ‘कोविड-१९’ स्वतंत्र पोर्टलची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:30 PM2020-04-28T22:30:54+5:302020-04-28T23:00:13+5:30

नाशिक लॉकडाउनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुविधांना परवानगी देण्यात आली आहे.

 Creation of 'Kovid-19' independent portal for e-pass | ई-पाससाठी ‘कोविड-१९’ स्वतंत्र पोर्टलची निर्मिती

ई-पाससाठी ‘कोविड-१९’ स्वतंत्र पोर्टलची निर्मिती

Next

नाशिक लॉकडाउनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुविधांना परवानगी देण्यात आली आहे. या सेवासुविधांमधील उद्योग आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या ई-पासेससाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ ‘कोविड-१९’ या पोर्टलवर रीतसर आॅनलाइन अर्ज करावेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत खालील अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास शासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, शेती व त्यासंबंधित उपक्रम व सेवा, वित्तीय सेवा, सामाजिक स्वरूपाच्या सेवा, आॅनलाइन व डिस्टन्स एज्युकेशन, मनरेगाची कामे, सार्वजनिक उपयोगाची कामे, राज्यांतर्ग व बाहेर मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वाणिज्य व खासगी आस्थापना, सरकारी व खासगी उद्योग, अनुज्ञेय बांधकामे, आपत्कालीन वाहतूक, भारत सरकारची व अधीनस्त, स्वायत्त व दुय्यम कार्यालये, राज्य शासनाची स्वायत्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या १५ प्रकारच्या सेवासुविधांचा समावेश आहे. त्यासाठी लागणारा ई-पास देण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

Web Title:  Creation of 'Kovid-19' independent portal for e-pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक