बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये औषधी वनस्पती उद्यानाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:47+5:302021-09-22T04:16:47+5:30
शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे सचिव बरकले, शाळेचे अध्यक्ष महाशब्दे शाळेच्या अधीक्षिका श्रीमती वाळुंजे, सरस्वती विद्यालयाचे चेअरमन ...
शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे सचिव बरकले, शाळेचे अध्यक्ष महाशब्दे शाळेच्या अधीक्षिका श्रीमती वाळुंजे, सरस्वती विद्यालयाचे चेअरमन कदम, अधीक्षिका श्रीमती कमोद, सहसचिव श्रीमती भट, नेहा मुळे व संस्थेचे सर्व गव्हर्निंग कॉन्सील सदस्य, इतर पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी, उपमुख्याध्यापिका श्रीमती पेठे, श्रीमती पेंढारकर, पर्यवेक्षिका श्रीमती वाघ व सौ. बाजपेयी उपस्थित होते.
यावेळी औषधी वनस्पतींच्या हस्तलिखिताचे प्रकाशनही वैशंपायन यांच्या हस्ते झाले. या औषधी वनस्पतीचे उद्यान निर्मितीची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी यांची होती आणि औषधी वनस्पतींची माहिती, तसेच औषधी वनस्पतींचे महत्त्व सर्व विद्यार्थिनींना कळावे, यासाठी हा उपक्रम राबविला असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन श्रीमती देशपांडे यांनी केले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका पेंढारकर आणि हरितसेना प्रमुख श्रीमती अर्चना गायकवाड, अर्चना व कला अध्यापक आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यावेळी उपस्थित हेाते.
छायाचित्र आर फोटोवर २१ गार्डन नावाने सेव्ह..