संस्कारांतून विचारांची निर्मिती : थोरात
By admin | Published: October 20, 2015 11:08 PM2015-10-20T23:08:11+5:302015-10-20T23:08:58+5:30
संस्कारांतून विचारांची निर्मिती : थोरात
निफाड : शरीर आणि बाह्य जग यातील दुवा म्हणजे मन होय. संस्कारांतून आपल्यामध्ये विचारांची निर्मिती होत असते. इच्छा निर्माण होऊन माणूस कृतीकडे वळतो. त्यातून सवयी लागून चारित्र्य
घडत असल्याचे प्रतिपादन विक्रम थोरात यांनी केले. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे त्यांनी तिसरे पुष्प गुंफले.
मनाला शक्तिशाली करण्यासाठी माणसामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. ज्ञानाची कास धरली तर मन:शक्ती वाढते. आपले मन:स्वास्थ्य टिकवायचे असेल तर छोट्या गोष्टीतून आनंद मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच सकस आहाराबरोबर शरीरासाठी प्राणायामचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पासाठी प्रायोजक म्हणून सामाजिक कार्यकर्ते वि. दा. व्यवहारे, प्रभाकर अहेरराव होते. सूत्रसंचालन नईम पठाण यांनी केले. रतनपाटील वडघुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)