क्रेडाई नाशिक मेट्रो आता ‘डिजिटल प्रॉपर्टी शो’चे आयोजन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:19 PM2020-07-16T22:19:03+5:302020-07-17T00:09:54+5:30
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्र ेडाई नाशिक मेट्रोतर्फे डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्र ेडाई नाशिक मेट्रोतर्फे डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ६६.ू१ीं्रिल्लं२ँ्र‘.ूङ्मे याद्वारे क्रे डाई नाशिक मेट्रो सदस्यांचे निवासी व व्यावसायिक प्रकल्प, रहिवासी, व्यावसायिक व औद्योगिक प्लॉट, फार्महाऊस तथा शेत जमिनी असे ८०हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे चारशेहून अधिक पर्याय जगापुढे सादर करण्यात आले आहे. या आॅनलाइन प्रॉपर्टी प्रदर्शनाचे क्रे डाई नॅशनलचे चेअरमन अक्षय शाह यांच्या हस्ते आॅनलाइन उद्घाटन करण्यात आले.
यासंदर्भात क्रे डाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी लॉक डाऊनच्या काळात स्वत:च्या घराचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आले. ग्राहकांना घराच्या बाहेर न पडता स्वत:च्या वास्तू स्वप्नपूर्ती चे विविध पर्याय बघता यावे याकरिता उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम अशा आॅनलाइन प्रॉपर्टी एक्स्पोची संकल्पना क्रे डाई नाशिक मेट्रोतर्फे अंमलात आणण्यात आली असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना घरी बसूनच स्वप्नातील घरकुल तसेच गुंतवणुकीच्या अनेक संधी यातून मिळणार असून या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रवी महाजन यांनी केले आहे. याप्रसंगी क्रे डाई राष्ट्रीय चे सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रे डाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रे डाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, क्रे डाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष उमेश वानखेडे तसेच उपाध्यक्ष कृणाल पाटील, सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, क्रे डाई युथ विंगचे समन्वयक निशित अटल व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
नाशिकमधील अपरिमित संधींची माहिती विषद करणारी एक फिल्मदेखील या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली असून, त्यामुळे नाशिकबाहेरील गुंतवणूकदारांना नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या मायक्र ो वेबसाइटचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारत तसेच अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर,आॅस्ट्रेलिया व हाँगकाँग या देशांतदेखील करण्यात येणार असून