कर्ज काढण्यासाठी मनपातर्फे पतमापन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:42 AM2020-09-23T01:42:28+5:302020-09-23T01:43:03+5:30
शहरातील रिंगरोड आण िखेडे - मळे भागातील रस्ते तयार करण्यासाठी सुमारे एक हजार रूपये कर्ज काढण्याच्या सत्तारूढ गटाच्या हालचाली सुरू आहे. तथापि, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारेच हे कर्ज मिळणार असल्याने त्यासाठी पतमापन करण्यात येणार आहे. महापालिकेची वित्तीय सल्लागार असलेल्या क्रि सील कंपनीला यासंदर्भात काम देण्यात आले आहे.
नाशिक : शहरातील रिंगरोड आण िखेडे - मळे भागातील रस्ते तयार करण्यासाठी सुमारे एक हजार रूपये कर्ज काढण्याच्या सत्तारूढ गटाच्या हालचाली सुरू आहे. तथापि, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारेच हे कर्ज मिळणार असल्याने त्यासाठी पतमापन करण्यात येणार आहे. महापालिकेची वित्तीय सल्लागार असलेल्या क्रि सील कंपनीला यासंदर्भात काम देण्यात आले आहे.
महापालिकेच्या सध्याच्या पंचवार्षिक कारिकर्द संपण्यासाठी अवघे दीड वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे आता नगरसेवकांची भांडवली कामांची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे यंदाचे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. उत्पन्न मिळत नसल्याने अजूनही भांडवली कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत अस्वस्थता आहे. दोन वर्षांपूर्वी अडीचशे कोटी रूपयांचे कर्ज काढुन रस्ते तयार करण्याची तयारी तयारी तत्कालीन भाजप महापौर रंजना भानसी यांनी केली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर मुळातच शहरातील डांबरावर डांबराचे थर टाकण्याचा हा प्रस्तावच रद्द केला. विद्यमान महापाौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र, रिंगरोड त्यांना जोडणारे मळे भागातील अविकसीत रस्ते विकसीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्या अतंर्गत आता प्रशासन महापालिकेचे उत्पन्न किती ते लक्षात घेऊन किती कर्ज उभारता येऊ शकते, याबाबत चाचपणी करीत आहे. त्यासाठीच क्रि सील कंपनीला काम देण्यात आले आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. विशेषत: कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक हजार कोटी रूपयांचे कर्ज काढण्याची महापालिकेची तयारी असली तरी आर्थिक स्थिती बघूनच कोणतीही वित्तीय संस्था तयार होईल. त्यामुळे त्यावर सध्या पतमापन करण्याची तयारी सुरू आहे.
किती कर्ज मिळणार याविषयी साशंकता
महापालिकेने यापूर्वी देखील भांडवली कामांसाठी कर्ज काढले आहे. सुरूवातीला शंभर कोटी रूपयांचे कर्ज काढले होते. त्यानंतर राष्टीयीकृत बॅँकेच्या माध्यमातून कर्ज देखील काढले होते. त्यामुळे कर्ज काढणे नवे नसले तरी महापालिकेला सद्यस्थितीत किती कर्ज मिळेल या विषयी शंका आहे.