युनिफाइड डीसीपीआरवरूनही श्रेयवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:56+5:302020-12-09T04:10:56+5:30
गेल्या तीन वर्षंपासून युनिफाइड डीसीपीआरचा विषय रेंगाळला होता. गेल्या महिन्यात तो मंजूर झाल्यानंतर अलीकडेच त्याची नियमावलीदेखील प्रसिद्ध झाली आहे. ...
गेल्या तीन वर्षंपासून युनिफाइड डीसीपीआरचा विषय रेंगाळला होता. गेल्या महिन्यात तो मंजूर झाल्यानंतर अलीकडेच त्याची नियमावलीदेखील प्रसिद्ध झाली आहे. त्याचे स्वागत हेात असताना साेमवारी (दि.७) महासभेत यांसदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव दिला होता. नव्या युनिफाइड डीसीपीआरमुळे तीन ते चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ दूर हाेऊन विकास हेाण्यास मदत हेाईल, असे त्यात म्हटले होते. यापूर्वीच्या विकास नियंत्रण नियमावलीत नाशिककरांवर अन्याय, तर नागपूरला झुकते माप देण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शहराचा विकास खुंटला होता. ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे शहर विकासाची उंची गाठेल अशा शब्दात भाजपच्या अगोदरच्या सरकारवर शरसंधान साधण्यात आले होते.
महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर करताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी युनिफाइड डीसीपीआर तयार करण्याचे काम मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केले हेाते याची जाणीव करून देत विद्यमान सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला.